Lek Ladaki Yojana: राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सर्वत्र चर्चा होत आहे. या योजनेमुळे पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळाले नसलेल्या महिलांना 3000 रुपये वितरित केले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, राज्यातील मुलींना 75000 रुपयांची आर्थिक मदत करणारी ‘Lek Ladaki Yojana’ बऱ्याच जणांना माहित नाही. या योजनेद्वारे मुलींना शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. चला तर मग, ‘Lek Ladaki Yojana’ नेमकी काय आहे आणि तिच्या लाभांसाठी कोणत्या अटी आहेत ते जाणून घेऊया.

‘Lek Ladaki Yojana’ ची सुरुवात:
राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून ‘माझी कन्या भाग्यश्री (सुधारित)’ या योजनेला अधिक्रमित करून ‘Lek Ladaki Yojana’ सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या सक्षमीकरणासाठी आहे आणि ही योजना केवळ राज्यातील मुलींना लागू आहे.
योजनेची मुख्य उद्दिष्टे:
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे
- मुलींचा जन्मदर वाढवणे
- शिक्षणास चालना देणे
- मुलींचा मृत्यूदर कमी करणे
- बालविवाह रोखणे
- कुपोषण कमी करणे
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे
Lek Ladaki Yojana अंतर्गत मिळणारे फायदे:
या योजनेद्वारे, पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर लगेच 5000 रुपये, पहिली इयत्तेत 6000 रुपये, सहावीत 7000 रुपये, अकरावीत 8000 रुपये, आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना फक्त 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एका अथवा दोन मुलींना लागू राहील.
अटी व नियम:
- एक मुलगा आणि एक मुलगी असल्यासही मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- दुसऱ्या प्रसूतीमध्ये जुळ्या मुलींचा जन्म झाल्यास एक किंवा दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- लाभार्थीचा जन्मदाखला
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला (उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे)
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)
- पालकांचे आधार कार्ड
- बँक पासबुकची छायांकित प्रत
- रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी)
- मतदान ओळखपत्र
- शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
- अंतिम लाभासाठी मुलीचे विवाह झालेले नसावे
Lek Ladaki Yojana फॉर्म कसा भरावा?
- सर्वप्रथम ‘Lek Ladaki Yojana’ चा फॉर्म डाउनलोड करा.
- अर्जात तुमची माहिती भरावी जसे की नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख इत्यादी.
- त्यानंतर मुलीची सर्व माहिती, जन्मतारीख, पत्ता भरा.
- बँक खाते माहिती भरा.
- पूर्ण झालेला अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा योजनेच्या कार्यालयात जमा करा.
- अर्जाच्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सर्व माहिती सत्य आणि पूर्ण असल्यास, योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.